भारंगीचे झाड असते. पावसाळ्यात ह्या झाडाला छान कोवळी हिरवी पाने येतात त्याची भाजी करतात.
हि भारंगीची फुले
साहित्य :
भारंगीच्या पानांना थोडा उग्र वास असतो. त्यामुळे ती आधी चिरून पाण्यात एक उकळी काढून पिळून घेतात.
मुके वाल म्हणजे रात्री भिजत घालून सकाळी भाजी करायला तयार असणारे मोड न आलेले वाल उकडून शिजवून घ्यावेत.
२ कांदे
४-५ लसूण पाकळ्या
२-३ मिरच्या
हिंग
हळद
चविपुरते मिठ
पाव वाटी ओल खोबर किसुन
फोडणीसाठी तेल
पाककृती
भांड्यात तेल गरम करून त्यावर लसूणाची फोडणी देऊन मिरची व कांदा परतावा.
आता ह्यावर भारंगीची भाजी व शिजवलेले वाल घालावेत.
आता झाकण ठेऊन थोडावेळ शिजू दया व नंतर परता.
आता मीठ व खोबरे घाला. आवडत असल्यास थोडी साखर घाला म्हणजे थोडी चव येते.
झाली भाजी तयार.
अधिक टिपा :
भाजी अशीच उकळून पिळून घ्यावी लागते नाहितर उग्र व कडवट लागते.
ह्या भाजीत कोलंबी, सुकट घालुनही करता येते.
वाल न घालताही साधी करता येते तसेच डाळी घालूनही करता येते.
No comments:
Post a Comment