Friday 6 July 2018

बोईट (तळलेले)



पावसाळ्यात बोईट मासे चांगले येतात. साध्या माशातच ह्याची गणना होते पण खूप  चविष्ट असतो. मधला एक काटा असतो. खालील वाटा १२० रु. ला मिळाला.  इतर  माशांच्या मानाने खूप स्वस्त आहेत.    हा मासा मोठा झाला कि त्याला पिळसा म्हणतात.

साहित्य :
बोईट ४-५
हिंग
हळद

१ चमचा आल लसूण पेस्ट
२ चमचे आगरी किंवा मालवणी मसाला
चवी पुरते मिठ
तेल

कृती :

बोईटाची खवले काढून त्याचे पोटाला चिर पाडून पोटातील घाण काढावी, शेपुट व पर काढावेत. मध्ये काही अंतरावर दोन चिरा दोन्ही बाजूंनी द्याव्यात. कापलेले मासे तीन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यावेत.



आता वरील साहित्यातील तेल सोडून सर्व साहित्य माश्यांना चोळून ठेवा.





शेगडीवर तवा चांगला तापवून घ्या आणि त्यावर तेल टाकून ते जरा तापले कि त्यात मासे सोडा.



मध्यम आचेवर एक बाजू ४-५ मिनिटे आणि दुसरी बाजू ३-४ मिनिटे शिजवून शेगडी बंद करा.


भाकरी किंवा चपातीबरोबर किंवा नुसतेही छान लागतात. बोईटाला  चांगली चव असते.


















No comments: