Wednesday 6 June 2018

भोपरं/भूईछत्री/आळंबी (मश्रुम्स)

भूईछत्र्या ह्या रानात, डोंगरात ढग गडगडायला लागल्यावर भुसभुशीत जमिनीत पहिल्या पावसाच्या  वेळी गरम जमिनीच्या कुशीतून यायला लागतात.  भूईछत्र्या ह्या खाण्याच्या आहेत हे मात्र खात्रीकरुन घ्यावे. ह्यात विषारी प्रकारही असतात. जाणकारांकडूनच ह्या घ्याव्यात.



लागणारे जिन्नस: 
भूईछत्री/मश्रुम्स
कांदे २
आल, लसुण, मिरची, कोथिंबिर पेस्ट १ चमचा
टोमॅटो १ ते २
हिंग
हळद
मसाला १ ते २ चमचे
तेल
चविनुसार मिठ
अर्धा चमचा गरम मसाला


न उघडलेली छत्री



क्रमवार पाककृती: 
प्रथम भूईछत्र्या सोलुन घ्यायच्या. सोलून घ्यायच्या म्हणजे ह्या थराथरांच्या आवरणांच्या बनलेल्या असतात. सगळ्यात वरचे आवरण काळपट असते ते काढून टाकायचे.


नंतर त्याला हातानचे सुट्टे करत त्याचे बारीक भाग करायचे.


हया भूईछत्र्यांचे तुकडे आता धुवुन घ्यायचे. भांड्यात तेल गरम करुन कांदा शिजत लावायचा. शिजला की त्यात आल्-लसुण, मिरची,कोथींबीरची पेस्ट टाकुन थोड परवायच. त्यानंतर हिंग, हळद, मसाला टाकुन परतवून भूईछत्र्यांच्या फोडी टाकायच्या. व ढवळून शिजत ठेवायचे. भुईछत्र्यांना पाणी सुटते थोडे.


साधारण १०-१५ मिनीटे शिजल्यावर त्यात वरुन टोमॅटो, मिठ व गरम मसाला घालायचा. टोमॅटो शिजला, पाणी आटले की गॅस बंद करायचा.
ही आहे तयार भूईछत्री/मश्रुम्सची भाजी. अगदी मटणासारखी लागते चविला.




ह्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो म्हणून भाजीत आजीबात पाणी घालू नये.
साफ करण्यात थोडा जास्त वेळ जातो त्यामुळे जास्त प्रमाणात करावयाची असल्यास चिकाटी बाळगावी.

11 comments:

varshu said...

वाह..मस्त . अनोखा ब्लाॅग आहे हा. एकदम हटके. आता आम्हाला तुझ्या चटकदार रेसिपीज अ क्लिक अवे असतील. थॅक्स प्राजक्ता

prajakta said...

Thanks Varshutai.

Unknown said...

आज पर्यंत कधी खाल्ली नाही, पण वर्णन वाचून खाईन पाहू या नक्की, एक नंबर लेखन केलेत

varshu said...

Oohh finally your long awaited blog is here. Heartiest congratulations dear Prajakta. तुझ्या चटकदार रेसिपी
Now just a click away
Great job!!!

Unknown said...

Wow.खुपच छान. अभिनंदन जागु. वाचताना चविष्ट वाटल्या रेसिपी

Unknown said...

मस्त जागु 😋

sulabha said...

अरे वा! प्राजू, अभिनंदन! आमच्यासाठी पण असूदेत काही. :P

prajakta said...

Thanks.

prajakta said...

Thanks Shalaka

prajakta said...

Thanku Vidya

prajakta said...

Sure. Thanks.